माजी मुख्यमंत्री अंतुले यांचे पुत्र नाविद यांचं निधन

राज्याचे माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर अब्दुल रेहमान अंतुले यांचे पुत्र नाविद अंतुले यांचं आज हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं. मुंबईतील सैफी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

नाविद अंतुले हे पूर्वी राजकारणात सक्रिय होते. मात्र, वडिलांच्या निधनानंतर ते काही काळ राजकारणापासून दूर होते. मागील वर्षीच्या लोकसभा निवडणुकीच्या आधी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. सीमा लढ्याविषयी बॅ. अंतुले यांनी घेतलेल्या भूमिकेमुळं शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी त्यांचे उत्तम संबंध होते. वडिलांच्या याच मैत्रीमुळं नाविद यांनी पुन्हा राजकारणात सक्रिय होताना शिवसेनेचा पर्याय निवडला होता.

शिवसेना प्रवेशानंतर नाविद यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांच्याविरोधात प्रचार केला होता. त्यामुळं येथील निवडणूक चुरशीची झाली होती. मात्र, या निवडणुकीत शिवसेनेचे अनंत गीते यांचा पराभव झाला. त्यानंतरही नाविद स्थानिक राजकारणात सक्रिय होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *