मुंबईत एकीकडे करोनाच्या रूग्णांची संख्या वाढत असली तरी दुसरीकडे काही सकारात्मक गोष्टीही घडत आहेत. संसर्गाच्या भीतीमुळे कन्टेंटमेंट झोन म्हणून जाहीर झालेल्या तब्बल २३१ ठिकाणे कोणत्याही नवीन रूग्णांची नोंद झालेली नाही. त्यामुळे ही ठिकाणे कन्टेंटमेंट झोनमधून वगळण्यात आली असून येथील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत.
करोनाच्या संसर्गामुळे शहर आणि उपनगरात ९३० ठिकाणे कन्टेंटमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले होते. या ठिकाणी नागरिकांच्या सार्वजनिक वावरावर कडक निर्बंध घालण्यात आले होते. मात्र १४ दिवस आढावा घेऊन टप्प्याटप्प्याने हे निर्बंध उठवण्यात आले आहेत. निर्बंध उठवण्यात आलेल्या विभागात कुलाबा २, मशिद बंदर, १, काळबादेवी ३, ग्रँट रोड २७, भायखळा ३, माटुंगा १२, परळ १०, वरळी ५, वांद्रे पूर्व २०, वांद्रे पश्चिम १३, अंधेरी पश्चिम ४०, कुर्ला ९, चेंबूर ७, मानखुर्द ९, मालाड २३, कांदिवली १५ या महत्त्वाच्या विभागांचा समावेश आहे
