‘त्या’ रुग्णाचा मृत्यू करोनाने नाही; पण बुलडाण्यात शुकशुकाट!

सौदी अरेबियातून आलेला आणि करोनाचा संशयित म्हणून उपचारादरम्यान मृत्यू झालेला व्यक्ती करोनाचा रुग्ण नसल्याचा अहवाल आला आहे. त्यामुळे आरोग्य प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला असला तरी करोना रुग्णाचा मृत्यू झाल्याच्या अफवेमुळे बुलडाण्यात दहशत निर्माण झाली आहे. त्याचा आठवडी बाजारावरही परिणाम झाला असून आज आठवडी बाजारात शुकशुकाट होता. एसटी स्टँडही ओस पडले होते.

सर्दी व तापाची लक्षणे असलेला करोनाच्या संशयित रुग्णाला बुलडाणा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन कक्षात शनिवारी दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी हा संशयित रुग्ण सौदी अरेबियातून आला होता. त्यांची मुंबई विमानतळावर तपासणीही करण्यात आली होती. मात्र, त्यांची प्रकृती चांगली वाटल्याने त्यांना त्यांच्या मूळगावी जाण्याची परवानगी देण्यात आलीहोती. मात्र, घरी आल्यावर त्यांना सर्दी, ताप आला. त्यामुळे ते खासगी रुग्णालयात गेले होते. तिथे डॉक्टरांना संशय बळावल्याने त्यांनी त्यांची रवानगी जिल्हा सामान्य रुग्णालयात केली. संबंधित रुग्णाचे रक्ताचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. मात्र, रिपोर्ट येण्यापूर्वीच रुग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे खळबळ उडाली होती. आठवडी बाजारही बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिले होते. यासंबधी आज अधिकृत रिपोर्ट आला असून त्यात त्याला करोनाची लागण झाली नसल्याचं स्पष्ट झालं आहे. कला रात्रीच या व्यक्तिवर अंत्यसंस्कार करण्यात आल्याचं जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *