अल्पवयीन मुलाला विवस्त्र करुन मारहाण करत चेहऱ्यावर लघुशंका, पुण्यातला क्रूर प्रकार

एका अल्पवयीन मुलाला तरुणांच्या टोळक्याने विवस्त्र करुन मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील हडपसर येथून समोर आला आहे. मारहाण करतानाचा व्हिडीओ तरुणांनी स्वत:चा व्हायरल केल्यानंतर ही घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे पुण्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

अल्पवयीन मुलाला विवस्त्र करुन मारहाण करण्यात आल्याचा प्रकार हडपसर येथे घडला. मारहाणी सोबतच त्याच्या तोंडावर मुत्रविसर्जन देखील करण्यात आले. कोयता आणि बेल्टने याला मारहाण केली गेली. या मारहाणी मागचे नेमके कारण अजून कळले नसले तरी झालेला प्रकार अत्यंत संतापजनक आहे.

पीडित मुलावर ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *