डहाणू नाशिक रोडवर पिकअपला अपघात ; एकाचा मृत्यू तर २२ जण गंभीर जखमी

लग्न कार्यक्रम आटोपून विक्रमगड सातखोर येथे जाणारा पिकअप गाडीचा अपघात झाला. चालकांच पिकअप वरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला.  अपघातात एकाचा मृत्यू तर २२  जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर कासा उपजिल्हा रुग्णायलात उपचार सुरू आहेत. त्यातील ५ जणांची प्रकृती चिंताजनक आहे तर एकाला गुजरातमधील वलसाड येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आलं आहे.

पिकअपमध्ये  जवळपास  ४० जण प्रवास करत होते. दोन दिवसांपूर्वीच या ठिकाणी घडलेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे या ठिकाणी वारंवार अपघाताची मालिका सुरूच आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *