पनवेल शहरातील पंचरत्न नाका परिसरात एका नाका कामगार महिलेची दोघा अज्ञात इसमांनी फसवणूक करून तिच्याकडील सोन्याचे दागिने व रोख रक्कम काढून घेवून पसार झाल्याची घटना घडली आहे. कौसल्या नामक नाका कामगार महिला ही कामावरुन घरी जात असताना तिला दोन अज्ञात इसमांनी अडवून पुढे ओळखीची महिला बाळंतीण झाल्याने साडी तसेच इतर वस्तूंचे वाटप होत आहे. तरी तु गळ्यातील सोन्याचे दागिने, हातातील अंगठी व बांगड्या काढून तुझ्याकडे असलेल्या पिशवीत ठेव असे बोलण्यात गुंतवून तिच्याकडील सोन्याचे दागिने व रोख रक्कम काढून घेवून ते पसार झाले आहेत.
