रायगड जिल्हा परिषदेमध्ये महाराष्ट्रचे माजी मुख्यमंत्री स्व.यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी करण्यात आली. मुख्य लेखा व वित्त अधिकारी दत्तात्रेय पाथरुट, उप मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास खोळपे व सामाजिक कार्यकर्ते उत्तम जाधव यांनी स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी जिल्हा कृषी अधिकारी लक्ष्मण खुरकुटे, सहाय्यक प्रशासन अधिकारी माणीकदास दळवी, कनिष्ठ प्रशासन अधिकारी पराग खोत व गणेश गीते, सहाय्यक लेखाधिकारी संजीव मोरे, देवेद्र भगत, सुरेश पाटील, तसेच जिल्हा परिषदेच्या विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
