मुंबईत करोनाचा रुग्ण नाही; आरोग्यमंत्र्यांनी केले स्पष्ट

मुंबईत करोनाचा एकही रुग्ण नसल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज स्पष्ट केले. दरम्यान, महाराष्ट्रात करोनाचे पाच रुग्ण आढळले असून स्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी बोलताना करोनाबाबत दक्षता बाळगण्याचे पुन्हा एकदा आवाहन केले. पुण्यात करोनाचे पाच रुग्ण आढळून आले आहेत. दुबईतून पुण्यात परतलेल्या दाम्पत्याला सर्वप्रथम करोना संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर हे दाम्पत्य ज्या विमानाने दुबईतून परतले होते त्या विमानातून महाराष्ट्रात आलेल्या सर्वच प्रवाशांची तपासणी करण्यात येत आहे. संबंधित सर्व प्रवाशांशी संपर्क झाला आहे, असे टोपे यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *