निवृत्त पोलिसाच्या घरी चोरी

सेवानिवृत्त पोलिसाच्या घरी चोरी झाली असून चोरट्यांनी घरातून सव्वाचार लाखांचे दागिने लंपास केले आहेत. हा प्रकार कळव्यातील खारेगावमध्ये घडला. मुंबई पोलिस दलातून सेवानिवृत्त झालेले ६४ वर्षीय गृहस्थ खारेगावमध्ये पत्नी, मुलांसह राहत आहे. मुलगा खासगी कंपनीत काम करत असून नुकतेच त्यांनी घराचे रंगकामही केले होते. ४ फेब्रुवारीला ते माजिवडा येथे नातेवाईकांच्या लग्नाला गेले. मात्र कार्यक्रम अर्धवट सोडून पत्नीसोबत घरी परतले. त्यावेळी रंगकाम करणारे कामगार इमारतीजवळ होते. मात्र, स्वयंपाकघरात कपड्यात गुंडाळून कपाटात ठेवलेले दागिने गायब असल्याचे १ मार्चला लक्षात आले. दागिन्यांचा घरात शोध घेतला. मात्र सापडले नाही. चोरट्यांनी घरातून ४ लाख २५ हजारांचे दागिने चोरले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *