जिममध्ये अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे करणाऱ्या विकृत जिम ट्रेनरला कल्याण कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली आहे. गणेश डांगोर असे या त्याचे नाव आहे. कल्याण पूर्वेकडील तिसगाव नाका परिसरात असलेल्या गणेश जिममध्ये गणेश डांगोर ट्रेनर म्हणून काम करतो.
या जिममध्ये एक अल्पवयीन मुलीने सरावासाठी अॅडमिशन घेतले होते. मात्र गुरुवारी पहिल्या दिवशीच जिम ट्रेनर गणेशने तिच्यासोबत अश्लील चाळे केले. या प्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीने कोळसेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार केल्यानंतर गणेशला अटक करण्यात आली.
