खोटे सोन्याचे दागिने खरे भासवून त्यावर गोल्ड लोन करून दोन जणांनी बँकेला फसवल्याचा प्रकार समोर आला आहे. अनिल उत्तम काळे (३२, रा. सिध्देश्वर नगर), रमेश गंगाधर उदावंत (४५, रा. बेगमपुरा) या दोघांनी हर्सूल परिसरातील महाराष्ट्र ग्रामीण बँक, शाखा रश्मीनगर येथे बनावट सोन्याचे ६ लाख ८४ हजार रूपयांचे खोटे प्रमाणपत्र तयार करून, बनावट सोने तारण ठेऊन त्यावर ४ लाख ७५ हजार रूपयांचे गोल्ड लोन उचलुन बँकेची फसवणुक केली आहे.
या दोघांनी जमा केलेल्या दागिन्यांचे प्रमाणपत्र जेव्हा तपासण्यात आले तेव्हा दागिने खोटे असल्याचे समोर आले. त्यानंतर उत्तमराव मनाजी चोपडे(५९) यांच्या फिर्यादीवरून अनिल उत्तम काळे व रमेश गंगाधर उदावंत या दोघांच्या विरोधात हर्सूल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकामे करत आहे.
