गृह राज्यमंत्री यांच्या जिल्ह्यात पोलीस अधिकाऱ्यांचे घर पेटवले

आकुर्डे (ता. भुदरगड) येथे जुगार अड्ड्यावर छापा टाकण्यासाठी गेलेल्या भुदरगड पोलिस ठाण्याच्या पथकावर जमावाने हल्‍ला करून उपनिरीक्षकासह तिघा पोलिसांना गंभीर जखमी केले. यानंतर रात्री दोन वाजता अधिकाऱ्याची दरात थांबलेली गाडी पेटवली. याची झळ लागून त्याचे घरही पेटले. याप्रकरणी भुदरगड पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

आकुर्डे येथे प्राथमिक शाळेशेजारी जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती भुदरगड पोलिसांना नियंत्रण कक्षातून मंगळवारी दुपारी मिळाली. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक अमित देशमुख, पोलिस नाईक अनिल चव्हाण, किरण पाटील, दिगंबर बसरवाडकर यांनी छापा टाकला. एका घरातील माडीवर सुमारे दहा ते बारा जण जुगार खेळत असल्याचे आढळून आले. त्यांनी कारवाई केली. मात्र जमावाने हल्ला केला. त्यात पोलीस जखमी झाले. यानंतर रात्री पुन्हा जमावाने घरावर हल्ला केला. गाडी पेटवली. त्यात त्याचे घरही पेटले. गृराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या जिल्ह्यातच हा प्रकार घडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *