सावरकरांच्या माफीनाम्यांची अंदमानात नोंद नाही

स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ब्रिटिशांना सादर केलेल्या माफीनाम्यांची अंदमान आणि निकोबार प्रशासनाकडे नोंद नाही, अशी माहिती केंद्र सरकारतर्फे मंगळवारी संसदेत देण्यात आली. अंदमान आणि निकोबार येथील सेल्युलर तुरुंगात दाखवण्यात येणाऱ्या लाइट अँड साऊंड शोमध्ये सावरकर यांच्या माफीनाम्याचा उल्लेख का नाही, अशी विचारणा सरकारकडे करण्यात आली होती. यावर केंद्रीय सांस्कृतिक मंत्री प्रल्हाद पटेल यांनी ही माहिती दिली.

अंदमान आणि निकोबार प्रशासनाच्या कला व सांस्कृतिक विभागाकडे या माफीनाम्यांविषयीच्या नोंदी उपलब्ध नाहीत. त्यामुळे या तुरुंगाच्या वस्तुसंग्रहालयामध्ये हे माफीनामे दर्शवण्यात आलेले नाहीत, अशी माहिती पटेल यांनी दिली. अंदमान आणि निकोबार प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे आपण हे नमूद करत आहोत, असेही ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *