औरंगाबाद: सिल्लोडमध्ये घरात घुसून महिलेला पेटवलं!

महिलेवर रॉकेल टाकून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणात आरोपी संतोष सखाराम मोहिते याला मंगळवारी (४ फेब्रुवारी) अटक करण्यात आली. त्याला न्यायालयात हजर केले असता, आरोपीला सोमवारपर्यंत (१० फेब्रुवारी) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. एस. देशपांडे यांनी दिले.

या प्रकरणी सिल्लोड तालुक्यातील ५० वर्षीय पीडित महिलेने फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, संबंधित पीडित महिला एकटीच राहते व तिच्या दोन्ही मुलींचे लग्न यापूर्वीच झाले आहेत. २ फेब्रुवारी २०२० रोजी रात्री ११ वाजता फिर्यादी घरात एकटीच असताना गावातील आरोपी संतोष सखाराम मोहिते (५०) हा तिथे आला व त्याने फिर्यादीच्या घराचे दार वाजवले. दार उघडताच समोर आरोपी संतोष दिसल्यामुळे, ‘तू रात्री-अपरात्री का येतो, तुझ्यामुळे माझी समाजात बदनामी झाली आहे’ असे ती त्याला म्हणाली. त्यावरून दोघांमध्ये भांडण झाले व संतप्त आरोपी संतोषने तिला शिवीगाळ व मारहाण करीत घरातील कॅनमधील रॉकेल तिच्या अंगावर टाकून तिला पेटवून दिले आणि आरोपी पळून गेला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *