हत्येच्या आरोपीने थेट पोलीस खात्यात भरती होत पोलिसांनाच चकवा दिल्याचा प्रकार घडला आहे. आरोपीने पोलिसात भरती होऊन १९ वर्ष झाली तरी पोलीस खात्याला थांगपत्ताच नाही. उत्तराखंडममध्ये हा अजब प्रकार समोर आला आहे. मुकेश कुमार असं या आरोपीचं नाव असून कॉन्स्टेबल या पदावर तो कार्यरत होती. पोलिसांनी पंतनगर पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
उत्तर प्रदेशातील बरेली येथे १९९७ रोजी झालेल्या एका हत्येच्या गुन्ह्यात मुकेश कुमार सहभागी होता. हा गुन्हा घडल्यानंतर चार वर्षांनी २००१ मध्ये त्याने उत्तराखंडमध्ये पोलीस खात्यात भरती होण्यासाठी अर्ज केला. पोलिसांना गंडवण्यासाठी त्याने आपला पत्ता बदलला होता. अर्ज करताना त्याने दुसरा पत्ता दिला असल्याने पोलिसांनाही संशय आला नाही. त्याच्याविरोधात चौकशी सुरु करण्यात आली असून त्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल असं अधिकाऱ्याने सांगितलं आहे
