जळगावातल्या लोहारामध्ये एकाच ठिकाणी 16 नाग आढळून आल्यानं मोठी खळबळ उडाली. पाचोरा तालुक्यात लोहारा गावात नथु सरोदे यांच्या शेतात एकाच वेळेस सोळा नाग निघाल्याची अतिशय दुर्मिळ घटना समोर आली आहे.
नथु सरोदे नेहमीप्रमाणे शेतात गेले होते. त्यावेळी त्यांना एक नागीण आणि 15 पिलं आढळून आली. बघता-बघता नाग आढळल्याची गावभर पसरली आणि सरोदे यांच्या शेतामध्ये गर्दी जमा झाली.
शेवटी सर्पमित्र अतुल कोळी यांनी नागीण आणि 15 पिलांना जंगलामध्ये सुरक्षित ठिकाणी सोडून दिले. एकाच वेळी इतके नाग निघाल्याने संपूर्ण गावात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

