पत्नीच्या हत्येप्रकरणी पतीला जन्मठेप

पत्नीच्या हत्येप्रकरणी पतीला तृतीय जिल्हा व सत्र न्यायाधीश डी.बी. पतंगे यांच्या न्यायालयाने शुक्रवारी जन्मठेपेची शिक्षा व पाच हजार दंड, दंड न भरल्यास अतिरिक्त एक वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.

गोरक्षण मार्गावरील कैलास नगरात राहणारा आरोपी प्रदीप किसनराव भुंबरकर (३५) हा व्यसनी असल्याने तो नेहमीच पत्नीला दारू पिण्यासाठी पैसे मागत होता. २४ मे २०१८ रोजी आरोपी प्रदीप भुंबरकर याने पत्नीला दारू पिण्यासाठी पैसे मागितले. पत्नीने नकार दिल्याने झालेल्या वादात प्रदीपने पत्नी वर्षां भुंबरकर हिच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिले. आरोपी घटनास्थळावरून पसार झाला. परिसरातील नागरिकांनी तिला सवरेपचार रुग्णालयात दाखल केले. खदान पोलिसांनी आरोपी प्रदीप भुंबरकर याच्याविरुद्ध भादंवि कलम ३०७ नुसार गुन्हा दाखल केला. पत्नीनी पोलिसांना दिलेल्या बयाणामध्ये तिला पतीने अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिल्याचे सांगितले. उपचारादरम्यान वर्षां भुंबरकर हिचा मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांनी पती प्रदीप याच्याविरुद्ध भादंवि कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. पोलिसांनी घटनेचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणात सरकार पक्षाने सात साक्षीदार तपासले. आरोपीच्या सावत्र मुलीनेही आरोपीविरुद्ध साक्ष दिली. न्यायालयाने साक्ष व मृत वर्षांचा मृत्यूपूर्व जबाब ग्रा धरून आरोपी प्रदीप भुंबरकर याला जन्मठेपेची शिक्षा व पाच हजार दंड, दंड न भरल्यास अतिरिक्त एक वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. सरकारतर्फे सहायक सरकारी विधिज्ज्ञ श्याम खोटरे यांनी बाजू मांडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *