बैठकीला अधिकारी उशिरा आल्याने अजित पवार नाराज

मराठवाड्याच्या दौऱ्यावर असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार सरकारी अधिकाऱ्यांवर नाराज झाल्याची बाब समोर आली आहे. आगामी अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर अजित पवार आज मराठवाड्याची बैठक घेणार आहेत. मराठवाड्यातील सर्व मंत्री या बैठकीला उपस्थित असतील. तत्पूर्वी अजित पवार सरकारी अधिकाऱ्यांसोबत एक बैठक घेणार होते. या बैठकीसाठी सकाळी दहा वाजताची वेळ निश्चित करण्यात आली होती. मात्र, अनेक अधिकारी या बैठकीला आलेच नाहीत. तर काहीजण वेळेनंतर या बैठकीसाठी हजर झाले. त्यामुळे अजित पवार सरकारी अधिकाऱ्यांवर नाराज झाल्याचे समजते.

दरम्यान, मराठवाड्यातील आजच्या बैठकीला सर्व मंत्री हजर असतील. मराठवाड्याच्या मागण्या आणि येत्या आर्थिक वर्षात मिळणार निधी याबाबत या बैठकीत चर्चा होईल. गेल्या महिन्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा औरंगाबादेत आढावा बैठक घेतली होती.

तत्पूर्वी अजित पवार आणि उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर मध्ये महत्वाची भूमिका असलेल्या औरंगाबादमधील ऑरीक सिटीला भेट दिली. मुख्य प्रशासकीय इमारतीचा पाहणी करताना आतापर्यंत याठिकाणी झालेल्या गुंतवणुकीचीही माहिती त्यांनी घेतली. तसेच येणाऱ्या अडचणीबाबत संबंधित अधिकाऱ्यांसोबत चर्चाही केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *