सांगलीत १००वं अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन

१००व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाला येत्या २६ मार्चपासून नाट्यदिंडीने सांगलीत सुरूवात होणार आहे. २७ मार्चला उद्घाटन समारंभ पार पडणार आहे. तर येत्या १४ जूनला नाट्य संमेलनाचा समारोप मुंबईत होणार आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी ही माहिती दिली. २७ मार्च ते ७ जून या कालावधीत महाराष्ट्रात ठिकठिकाणी छोटी छोटी संमेलनं होणार आहेत. ख्यातनाम दिग्दर्शक जब्बार पटेल हे या नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *