हळदीत डान्स करताना तरुणाचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू

लग्न सोहळ्याच्या आनंदावर विरझण पडण्याची दु:ख घटना नुकतीच समोर आली आहे. लग्नानिमित्ताने आयोजित केलेल्या हळदी समारंभात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. डीजेच्या तालावर नाचता नाचता या तरूणाला हृदय विकाराच्या झटका आला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.

अर्शद असलम शेख (२५) असे मृतक तरुणाचे नाव आहे. उल्हासनगर शहरातील कॅम्प नं.३ येथील ओटी सेक्शन परिसरात एक हळदी सभारंभात होता. या हळदी समारंभात डीजेच्या तालावर नाचत असताना अर्शदच्या छातीत दुखू लागल्याने त्याला उपचारासाठी त्वरीत मध्यवर्ती शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले.

मात्र येथील डॉक्टरांनी त्याला तपासून मृत झाल्याचे घोषित केले. याप्रकरणी मध्यवर्ती पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद दाखल करण्यात आली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जातेय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *