आंतरराष्ट्रीय कमॉडिटी बाजारात खनिज तेलाच्या किंमती ६० डाॅलरच्या खाली गेल्याने भारतीय पेट्रोलियम कंपन्यांना दिलासा मिळाला आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन दर कपातीचे धोरण कायम ठेवले असून सोमवारी त्यांनी पेट्रोलमध्ये १५ पैसे तर डिझेलमध्ये २५ पैशांची कपात केली. चीनमधील ‘करोना’ व्हायरसचे खनिज तेलाच्या बाजारपेठेवर परिणाम झाले आहेत. यामुळे चीनची तेलाची मागणी कमी होण्याची शक्यता आहे. मुंबईत पेट्रोल ८० रुपयांखाली आले आहे.
आंतरराष्ट्रीय कमॉडिटी बाजारात खनिज तेलाच्या किमती कमी होत असल्याने १२ जानेवारीपासून पेट्रोलियम कंपन्या इंधन दर कमी करत आहेत. मागील पाच दिवसात पेट्रोल १ रुपया ११ पैसे आणि डिझेल १ रुपया ३४ पैशांनी स्वस्त झाले आहे. खनिज तेलाचा भाव (यूएस क्रूड) प्रति बॅरल ६० डॉलरच्या खाली आला आहे. सोमवारी देशभरात पेट्रोलमध्ये १५ पैसे तर डिझेलचा दर २५ पैशांची घसरण झाली. मुंबईत पेट्रोल प्रति लीटर ७९.३२ रुपये तर डिझेलचा दर ६९.९३ रुपये आहे. नवी दिल्लीत पेट्रोलसाठी ग्राहकांना ७३.७१ रुपये मोजावे लागत असून डिझेलचा दर ६६.७१ रुपये झाला आहे. बंगळूरमध्ये आजचा पेट्रोलचा दर ७६.१७ रुपये आहे. डिझेल ६८.९३ रुपये आहे. चेन्नईत पेट्रोल ७६.५६ रुपये आणि डिझेल ७०.४७ रुपये आहे. हैद्राबादमध्ये पेट्रोल ७८.३८ रुपये असून डिझेल ७२.७४ रुपये आहे. गुडगावमध्ये पेट्रोलचा दर प्रति लीटर ७३.४४ रुपये असून डिझेल ६५.८८ रुपये आहे.
खनिज तेलाचा भाव चार महिन्याच्या नीचांकावर
