महाराष्ट्र बंद: बेस्ट बसवर दगडफेक; चालक जखमी

सुधारीत नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिकता नोंदणीविरोधात वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला मुंबई हिंसक वळण लागले. चेंबूर परिसरात एका बेस्ट बसवर दगडफेक करण्यात आली. यामध्ये बस चालक जखमी झाला आहे.

चेंबूर स्वस्तिक पार्क येथे सकाळी ९.१५ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. बस क्रमांक ३६२ धावत असताना बसच्या पुढील काचेवर दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत बसची मोठी काच फुटली. बस चालक विलास दाभाडे (वय ५३) यांच्या दोन्ही हातांना काचेचे तुकडे लागले. यामुळे ते जखमी झाले असून त्यांच्यावर गोवंडी येथील शताब्दी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दगडफेकीत कोणीही प्रवासी जखमी झाले नाही.

दरम्यान, वंचितने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला राज्यात संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. मुंबईत जनजीवन सुरळीत असून काही ठिकाणी तणावपूर्ण शांतता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *