उत्तर प्रदेशातील आपल्या घराकडे निघालेल्या एका प्रवासी महिलेवर मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनसजवळ सामूहिक बलात्कार झाल्याची घटना उघड झाली आहे. ही घटना काल रात्री ११ च्या सुमारास घडली. या प्रकरणातील ४ आरोपींना नेहरु नगर पोलिसांनी अटक केली असून पोलीस त्याची चौकशी करत आहेत.रात्री घडलेल्या या सामूहिक बलात्काराच्या घटनेमुळे लोकमान्य टिळक टर्मिनस परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. सोनू तिवारी, निलेश बारसकर, सिद्धार्थ वाघ आणि श्रीकांत भोगले अशी आरोपींची नावे आहेत.
