केद्रशासित प्रदेश असलेल्या लडाखमध्ये चादर ट्रेकवेळी फसलेल्या १०७ लोकांची यशस्वी सुटका करण्यात आली. स्थानिक आपत्ती निवारण टीम आणि भारतीय लष्कराच्या संयुक्त अभियानाद्वारे फसलेल्या लोकांची सुटका करण्यात आली. सुटका करण्यात आलेल्या लोकांमध्ये विदेशी लोकांचाही समावेश आहे. भारतीय हवाई दलाने देखील या बचाव कार्यात मोठे योगदान दिले आहे.
अभियानाबाबत भारतीय हवाई दलाने ट्वट करत माहिती दिली आहे. भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टर्सनी फसलेल्या इतर ट्रेकर्ससह ९ विदेशी नागरिकांची यशस्वीपणे सुटका केली. यात २ फ्रान्सचे तर, ७ चीनी नागरिक होते. याबरोबर लडाखच्या एका आजारी महिला पर्यटकालाही वेळेत औषधोपचार देत तिचे प्राण वाचवण्यात आले.
केवळ भारतीय हवाई दलाने गेल्या दोन दिवसांमध्ये १०७ लोकांचे प्राण वाचवले आहेत. जो पर्यंत फसलेले सर्वच्या सर्व ट्रेकर्सची सुखरूप सुटका होत नाही, तो पर्यंत भारतीय हवाई दलाचे बचाव कार्य सुरूच राहील असे भारतीय हवाई दलाने स्पष्ट केले आहे.
