लग्नाचे आमिष दाखवून विवाहितेवर अत्याचार

नोकरीला असणाऱ्या ३४ वर्षीय विवाहितेला  लग्नाचे अमिष दाखवून तिच्यावर गेल्या पाच महिन्यापासून  लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.  प्रवीण सोपान भुजाडे (रा.आपेगांव ता.कोपरगांव) असे आरोपीचे नाव असून त्याच्याविरोधात कोपरगाव शहर पोलिसांनी बलात्काराचा, लुबाडणूक व फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. पीडित विवाहिता २०१९ मध्ये नोकरीस लागली. त्यानंतर प्रवीणने तिच्यावर विवाहाचे आमिष दाखवून बलात्कार केला. त्यानंतर तिचे बँकेत खाते उघडून  ८ तोळे वजनाचे तिचे दागिने  गहाण ठेवले, तिच्याकडून  मुलाची फी भरण्यासाठी २७ हजार रुपये घेऊन प्रत्यक्षात १० हजार रुपये फी भरुन बाकीचे पैसे स्वत:कडे ठेवले. प्रवीणला पहिल्या  लग्नाबाबत विचारणा करता सदर महिलेस हाकलून दिले. उप विभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे , पोलीस निरीक्षक राकेश मानगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली दीपक बोरसे याबाबत तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *