नशेबाजाने डॉक्टर बनून काढले रुग्णाचे रक्त

दारूसाठी पैसे मिळावेत यासाठी एका नशेबाजाने ‘डॉक्टर’ बनून एका रुग्णाचे रक्त काढल्याचा धक्कादायक प्रकार सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात उघडकीस आला आहे. अब्दुल गफार कादर शेख असे या बोगस डॉक्टरचे नाव असून, या प्रकरणी सायन पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

मूळच्या रत्नागिरी जिल्ह्यातील असलेल्या प्रमिला शिर्के यांचे पती प्रवीण यांच्याबाबतीत हा प्रकार घडला. मधुमेहग्रस्त असलेल्या प्रवीण यांना उपचारांसाठी सायन हॉस्पिटलात दाखल करण्यात आले होते. २८ डिसेंबर रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास अब्दुल शेख डॉक्टरसारखे पांढरे कपडे घालून आला आणि सीरिंजने प्रवीण यांचे रक्त काढले. पत्नी प्रमिला यांनी हटकले असता, तपासणीसाठी रक्त काढल्याचे त्याने सांगितले. मात्र, त्यासाठी आठशे रुपयांची मागणी त्याने केल्यानंतर तो बोगस डॉक्टर असल्याचे उघड झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *