विनयभंगाच्या आरोपामुळे 17 वर्षाच्या मुलाची आत्महत्या

17 वर्षाचा तरुण मुलगा गमावल्याचा आक्रोश ह्रदय पिळवटून टाकणारा आहे. बरड गाव यामुळं सुन्न झालं आहे. त्याचं झालं असं की एका मुलावर गावातीलच एका अल्पवयीन मुलीची छेड काढल्याचा आरोप झाला.

मुलीचे नातेवाईक पोलिसात गेले. पोलिसांनी दोन्ही बाजूच्या लोकांची समजूत घालून प्रकरण रफादफा केलं. पण त्यानंतरही मुलीच्या नातेवाईकांनी गुपचूप जाऊन पोलिसात तक्रार केली. घाबरलेल्या मुलानं थेट गळफास घेऊन आत्महत्या केली.

ह्या धक्कादायक प्रकारानंतर तरुणाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याच्या आरोप बागल कुटुंबियांनी केला आणि अल्पवयीन मुलींच्या नातेवाईकांविरोधात गुन्हा दाखल केला.

मुलीची छेड काढल्याचा प्रकार सुरुवातीलाच पोलिसांनी गांभिर्यानं घेतला असता आणि दोन्ही कुटुंबाविरोधात योग्य कारवाई केली असती, तर कदाचित 17 वर्षाच्या मुलावर आत्महत्या करण्याची वेळ आली नसती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *