बोनेटवर ३०० फूट फरफटत नेले चालकाला

ऐरोलीच्या खेडकर चौकात कारने शिवनेरी बसला धडक दिल्यानंतर कार चालकाने शिवनेरी बस ड्रायव्हरलाच गाडीच्या बोनेटवर बसवून फरफटत नेल्याचा धक्कादायक प्रकार नवी मुंबईत समोर  आलाय. ऐरोलीमध्ये हा धक्कादायक प्रकार एका सिग्नलवरील सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

महाराष्ट्र राज्याच्या शिवनेरी बसला मागून येणाऱ्या स्विफ्ट कारने धड़क दिली होती. ड्रायव्हर आणि कारचालकामध्ये वाद झाला. यामध्ये कारचालक अब्दुल अन्सारीने भांडणामध्ये व्होल्वो बसचे वायपर तोडले. त्यामुळे बसचालक संतोष शिळीमकर चांगलाच भडकला. त्यानंतर पुढे जे घडलं ते एखाद्या चित्रपटातील थरार नाट्यासारखं होतं.

याचा जाब विचारणाऱ्या बस चालकालाच कार चालकाने आपल्या कारने उडवले, ड्रायव्हर बोनेटवर आदळला, त्यानंतर बोनेटवर अडकलेल्या ड्रायव्हरला ३०० मीटर फरफटत नेले. मात्र हा सर्व प्रकार सीसीटिव्ही मध्ये कैद झाला आहे. या नंतर मात्र रबाळे एमआयडीसी पोलिसांनी स्विफ्ट कार चालक हूनायुन अब्दुल अन्सारी अटक केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *