काश्मीरमधील शोपियन जिल्ह्यातील मशिदीच्या आवारात झालेल्या ग्रेनेड स्फोटात ११ जखमी

काश्मीरमधील शोपियन जिल्ह्यातील मशिदीच्या आवारात झालेल्या ग्रेनेड स्फोटात ११ जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.

जिल्ह्यातील जमिया ट्रेंझ मशिदीच्या आवारात सकाळी नमाज पठणाच्या वेळेस ग्रेनेडचा स्फोट झाला. यात ११ नागरिक जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मशिदीच्या बाहेरील कंटेनरमध्ये ग्रेनेड ठेवण्यात आले होते.

याप्रकरणी पोलिसांचा तपास सुरु झाला असून अद्याप कोणत्याही संघटनेने या स्फोटाची जबाबदारी घेतलेली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *