कळंबोली गावात राहणाऱ्या हसिना खातून (७५) या वृध्द महिलेचा मलनिस्सारण वाहिनीच्या गटारात पडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली.
रविवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास स्वच्छतालयाकडे गेलेली आई परत कशी आली नाही, म्हणून तिचा शोध घेतला असता स्वच्छतागृहाच्या टाकीत पडली असल्याचे लक्षात आले. कळंबोली अग्निशमन पथकाला बोलावून या महिलेला बाहेर काढून कामोठे येथील एमजीएम रूग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी मृत असल्याचे घोषित केले. या घटनेची तक्रार कळंबोली पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली असून पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.