रिक्षा चालवत असतानाच रिक्षाचालकाचा ह्रदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना वर्सोवा येथील वाकोला पुलावर घडली आहे. रिक्षातील प्रवाशांनी तातडीने पोलिसांना कॉल केला ( १००) तसंच मेडिकल इमसरजन्सी नंबर १०८वरही संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांकडून किंवा मेडिकल इमरजन्सी नंबरवरून त्यांना कोणतीच मदत मिळाली नाही.
त्याचवेळी भाभा रुग्णालयाची एक रुग्णवाहिका तिथून जात होती. रुग्णवाहिकेत एकही रुग्ण नव्हता. त्यामुळे रुग्णवाहिकेचा चालकही गवाणकर यांना रुग्णालयात नेण्यास तयार झाला. आनंदिता कुव्हूर त्यांची बहीण आणि अजून एक इसम गवाणकर यांना घेऊन रुग्णवाहिकेतूनच भाभा रुग्णालयात पोहोचले. भाभा रुग्णालयात गवाणकर यांना मृत घोषित करण्यात आलं.
या सगळ्या घटनाक्रमात प्रशासकीय व्यवस्थेकडून किंवा पोलिसांकडून कोणतीही मदत मिळाली नाही. मेडिकल इमरजन्सीचा नंबर लागलाच नाही. पोलिसांकडूनही कोणतीच मदत वेळेवर पोहोचली नाही. राज्य आरोग्य विभागाच्या प्रवक्त्यांनी याप्रकाराबद्दल मौन बाळगलं आहे. तेव्हा एखाद्या आपात्कालीन स्थितीला झुंज देण्यासाठी मुंबईची आरोग्य व्यवस्था आणि प्रशासकीय यंत्रणा खरोखर सक्षम आहे का यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.
