रात्रभर सुरू असलेल्या पावसाचा फटका मुंबईतील रेल्वे सेवेला बसला आहे. मध्य रेल्वेची सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. तर पश्चिम रेल्वेची वाहतूक उशिरानं सुरू आहे. अनेक भागांत रेल्वे रुळांजवळ पाणी साचल्यानं रेल्वे सेवेवर परिणाम झाला आहे. मुंबई, ठाण्यासह नवी मुंबईत गेल्या काही दिवसांपासून पावसानं जोर धरला आहे. याचा परिणाम वाहतूक व्यवस्थेवर झालेला पाहायला मिळतो आहे.
