राहुल महाजन यांनी हे फोटो ट्विटरवर पोस्ट केले आहेत.
या फोटोमध्ये राधे माँ लाल रंगाच्या मिनी स्कर्ट घातलेल्या दिसत आहेत. राहुल यांनी हे फोटो पोस्ट करताना ओळखा पाहू कोण? असेही पोस्टवर म्हटले आहे.
याआधी काही दिवसांपूर्वी राधे माँच्या डान्सचा व्हिडीओ प्रसारमाध्यमांमध्ये दाखवण्यात आला होता. दरम्यान, हुंड्यासाठी छळ केल्याच्या आरोपाखाली कांदिवली पोलीस ठाण्यात राधे माँ विरोधात तक्रार दाखल करण्यात आली. राधे माँच्या सांगण्यावरुन सासरच्या लोकांनी हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप तक्रारदार महिलेने केला आहे.
प्रसारमाध्यमांमध्ये सध्या चर्चेत असलेल्या स्वयंघोषित गुरु राधे माँ यांचे सोशल मिडियावर काही फोटो चांगलेच व्हायरल झाले आहेत.

