नाशिकमध्ये नदीत बुडून एकाचा मृत्यू; दोघांचा शोध सुरु दिंडोरी तालुक्यातील ओझेमधील घटना

नाशिक जिल्ह्यात तलावांमध्ये आणि धरणांमध्ये बुडून मृत्यू होण्याचे प्रमाण वाढते आहे. आज सकाळी दिंडोरी तालुक्यातील ओझे कादवा नदीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या तिघांपैकी एकाचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. त्यापैकी दोघांचा शोध अद्याप सुरू आहे.

दिंडोरी तालुक्यातील ओझे या गावात पाहुणे आलेले उमराळे खुर्द या गावातील रहिवासी अनिता यादव वाघमारे, मुलगा ओंकार यादव वाघमारे तसेच प्राजक्ता बाळू गांगोडे हे कादवा नदीत बुडाले. त्यापैकी अनिता यादव वाघमारे यांचा बुडून मृत्यू झाला असून त्यांना ओझे येथील ग्रामस्थांनी पाण्यातून शोधून बाहेर काढले आहे. तसेच ओंकार वाघमारे व प्राजक्ता गांगोडे यांना ग्रांमस्थांच्या मदतीने शोधण्याचे काम चालू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *