विहिंपच्या शोभायात्रेत मुलींजवळ रायफली; गुन्हा दाखल

विश्व हिंदू परिषदेच्या वतीनं काल, रविवारी रात्री पुण्यातील निगडीमध्ये अंकुश चौक ते ठाकरे मैदानादरम्यान विनापरवाना काढलेल्या शोभायात्रेत मुलींच्या हातात एअर रायफली आणि तलवारी दिल्या होत्या. या प्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात ‘विहिंप’च्या तीन नेत्यांसह २०० ते २५० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विहिंपच्या वतीनं अंकुश चौक ते ठाकरे मैदानदरम्यान शोभायात्रा काढण्यात आली होती. या शोभायात्रेत शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. या यात्रेत सहभागी झालेल्या चार मुलींच्या हातात एअर रायफली देण्यात आल्या होत्या. पाच मुलींच्या हातात तलवारी देऊन जोरजोरात घोषणा दिल्या गेल्या. ‘शोभायात्रा विनापरवाना काढण्यात आली होती. तसंच शोभायात्रेत कार्यकर्त्यांनी शस्त्रे बाळगल्याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात विहिंपचे नेते शरद इनामदार, धनाजी शिंदे आणि नितीन वाटकर यांच्यासह २०० ते २५० कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अद्याप कुणालाही अटक करण्यात आली नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *