धोनी ठरला पहिला ग्राहक, TVS ची नवी शानदार Apache लाँच

TVS ने आपली फ्लॅगशिप बाइक Apache RR 310 नव्या अवतारात लाँच केली आहे. थोड्याफार प्रमाणात बाइकमध्ये मॅकेनिकल आणि कॉस्मेटिक बदल करण्यात आले आहेत. मात्र, नव्या बाइकमधील सर्वात मोठा बदल म्हणजे यामध्ये स्लिपर क्लच देण्यात आला आहे. याशिवाय ही बाइक नव्या ‘फँटम ब्लॅक’ रंगातही उपलब्ध असणार आहे. यापूर्वी केवळ सामान्य काळ्या रंगात ही बाइक उपलब्ध होती. नव्या रंगात वेगळी फिनिशींग आणि लाल-पांढऱ्या रंगाची स्ट्रिप आहे. याव्यतिरिक्त बाइकमध्ये अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही. कंपनीच्या ठरावीक डिलरशीपमध्ये ही बाइक विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आली आहे. विशेष म्हणजे क्रिकेटपटू महेंद्र सिंह धोनी या बाइकचा पहिला ग्राहक ठरला. धोनीने रेसिंग रेड कलरमधील बाइक घेतली.

पावर, इंजिन, फीचर्स –
फुल फेअर्ड शार्प स्टाइल असलेल्या या बाइकमध्ये 312.2 cc लिक्विड-कूल्ड इंजिन आहे. हे इंजिन 33.52 bhp पावर आणि 27.3 Nm टॉर्क जनरेट करतं. इंजिन स्लिपर क्लचसह 6-स्पीड गिअरबॉक्स आहे. स्लिपर क्लचमुळे वेगात बाइक चालवत असतानाही पटकन आणि सहजतेने गिअर चेंज करता येतात. ड्युअल चॅनल एबीएस फीचर देखील आहे. बाइकचा टॉप स्पीड 160 किलोमीटर प्रतितास इतका असल्याचा कंपनीचा दावा आहे. ही बाइक 7.17 सेकंदात 0 ते 100 किलोमीटर प्रतितास इतका वेग पकडू शकते. यामध्ये मोठा डिजिटल इंस्ट्रुमेंट क्लस्टर आहे. यात स्पीडोमीटर, टेकोमीटर, ट्रिप मीटर याशिवाय लॅप टाइमर, रेस डायग्नोस्टिक्स सिस्टिम, स्पीड रेकॉर्डर आणि लॉंच टाइम रेकॉर्डर अशा सुविधा आहेत.

किंमत –
किंमतीबाबत विचार केल्यास जुन्या मॉडलच्या तुलनेत ही बाइक 3 हजार रुपयांनी महाग आहे. 2.27 लाख रुपये इतकी या नव्या बाइकची एक्स-शोरुम किंमत ठेवण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *