उत्तर प्रदेशमध्ये विषारी दारूमुळे 12 जणांचा मृत्यू

उत्तर प्रदेशमधील बाराबांकी जिल्ह्यामध्ये विषारी दारू प्यायल्याने 12 जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. एकाच कुटुंबातील चार जणांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. दारू प्यायल्यानंतर काही जण आजारी पडले असून त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विषारी दारू प्यायल्याने उत्तर प्रदेशच्या बाराबांकी जिल्ह्यामधील एका गावातील 12 जणांचा मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्र्यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त केले असून कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. गावातील एका दुकानातून काही गावकऱ्यांनी दारू विकत घेतली होती. मात्र दारू प्यायल्यानंतर त्यांची दृष्टी गेली. तसेच इतरही त्रास सुरू झाला. उपचारासाठी त्यांना जवळच्या रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान विषारी दारूमुळे 12 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण आजारी पडल्याने सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *