फेसबुक इमेजच्या लाइकवरून मारहाण

नकळत फेसबुक खात्यामधील इमेज लाइक केल्याच्या कारणावरून तरुणाला मारहाण झाल्याचा प्रकार घडला. या मारहाणीत हा तरुण जखमी झाला असून राबोडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कार मेकॅनिक असलेला इसराईल नसीर खान (२३) हा सायंकाळी चहाची विक्री करतो. त्याचे फेसबुकवर खाते असून १८ मे रोजी काही व्यक्तींच्या खात्यावरील इमेज लाइक केल्या होत्या. मात्र यातील एक खाते आरोपी अमीर याच्या भावाचे असल्याचे इसराईल याला माहिती नव्हते. त्याने फोटो लाइक केल्याच्या रागातून आरोपी दुसऱ्या दिवशी अर्थात रविवारी रुस्तमजी कॉम्प्लेक्स परिसरात मोटारसायकलवरून आला. लाइक केल्याबाबतचा जाबही विचारला. इसराईलने त्याला समजवण्याचा प्रयत्न करूनही तो एकूण घेण्याच्या मनस्थितीत नव्हता. आरोपीने ठोशाबुक्याने आणि बांबूने मारहाण केल्याने इसराईल जखमी झाला. नंतर आरोपी पळून गेला. तसेच पोलिस ठाण्यात तक्रार केल्यास खोट्या केसमध्ये फसवण्याची धमकी आरोपीने दिली. या प्रकाराने घाबरलेल्या इसराईलने पोलिस ठाण्यात त्यादिवशी तक्रार केली नव्हती. सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी गेल्यानंतर मोटारसायकल अपघातात जखमी झाल्याचे सांगितले होते. मित्रांना या प्रकाराची माहिती दिल्यांनतर अखेर मित्रांनी धीर दिल्यांनतर त्याने तक्रारीसाठी पोलिसांकडे धाव घेतली. मंगळवारी अमीर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी हा भिवंडीतील कोनगाव परिसरात राहतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *