खेळणे दाखवून चिमुकलीशी अश्लील चाळे

खेळणे दाखवून पाच वर्षीय चिमुकलीशी १९ वर्षीय युवकाने अश्लील चाळे केली. ही संतापजनक घटना बेलतरोडी भागात उघडकीस आली. पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अभिषेक घरडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तो खासगी काम करतो.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिषेक याच्या आई-वडिलाचे निधन झाले. नातेवाइकासह तो बेलतरोडी भागातील फ्लॅटमध्ये राहातो. या भागात पीडित मुलीच्या आईचे नातेवाइक राहातात. काही दिवसांपूर्वी ती दोन मुलींसह माहेरी आली. दोन्ही मुली फ्लॅटसमोर खेळत होत्या. पाच वर्षीय मुलीला खेळणे देण्याच्या बहाण्याने अभिषेक याने फ्लॅटमध्ये बोलावले. दरवाजा बंद करून तिच्याशी अश्लील चाळे केले. मुलीने आरडाओरड केली. अभिषेकने तिला सोडले. ती रडत घरी गेली. तिच्या आईने तिला विचारणा केली. अभिषेक याने अश्लील चाळे केल्याचे तिने आईला सांगितले. तिची आई संतापली. तिची आई जाब विचायला अभिषेकच्या फ्लॅटमध्ये गेली. तोपर्यंत अभिषेक पसार झाला होता. तिच्या आईने बेलतरोडी पोलिस स्टेशन गाठून तक्रार दिली. पोलिसांनी विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून अभिषेक याचा शोध सुरू केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *