मुंबई-पुणे महामार्गावर खालापूरजवळ आज दोन बसमध्ये जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात २ जण ठार झाले, तर २० हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत.
खालापूरजवळ आज सकाळी भीषण अपघात झाला. दोन बस एकमेकांना धडकल्या. अपघातात दोन प्रवासी ठार झाले आहेत. तर २० हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच, स्थानिक नागरिक, पोलीस, बचाव पथके घटनास्थळी पोहोचली. बचाव आणि मदतकार्य हाती घेतलं आहे.
