नागाच्या दंशाने सर्पमित्राचा मृत्यू

शिवडी कोळीवाड्यातील एका घरात शिरलेल्या नागाला पकडताना त्याने दंश केल्याने सर्पमित्र राजू सोलंकी यांचा बुधवारी दुपारी केईएम रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. शाहनबाज शेख यांच्या घरी हा नाग शिरला होता.

पकडलेला नाग अंदाजे एक फुटाचा होता. त्याला प्लास्टिकच्या बाटलीत भरत असताना नागाने सोलंकी यांच्या उजव्या हाताच्या बोटावर दंश केला. मात्र, त्यानंतरही सोलंकी यांनी हातातले काम सोडले नाही. हे नागाचे छोटे पिल्लू असल्याने काही होणार नाही, या भ्रमात राहिलेल्या सोलंकी यांना ही चूक महागात पडली. दंश झालेला त्यांचा हात सुजला आणि त्यानंतर विष शरीरात भिनत गेले. त्यांना तातडीने केईएम रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, दाखल करण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *