हॉटेलात गाढवाचं मटण विकणाऱ्या टोळीला अटक

परिसरात फिरणारी गाढवं पकडून त्यांची कत्तल करून मटण कमी किमतीमध्ये हॉटेलात आणि छोट्या ढाब्यावर विकणाऱ्या आंध्र प्रदेशमधील टोळीला पंढरपूर पोलिसांनी अटक केली आहे.

रात्री गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या पथकाने कारवाई करून पाच जणांच्या टोळीला टेम्पो आणि हत्यारांसह ताब्यात घेतलं आहे. आरोपी राज्यभर फिरुन हॉटेलांत असं मटण विकत असल्याचं समोर आलं आहे.

आरोपी टेम्पोमध्ये मटण कापण्यासाठी लागणारं हत्यारे घेऊन रात्री बाहेर पडत. रात्री फिरणारी गाढवं पकडून त्याचे मटण हॉटेलमध्ये विकत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी सापळा रचून या टोळीला जेरबंद केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *