लिफ्टवरुन पडून मॅकेनिकचा मृत्यू

दुरुस्तीच्या वेळी तोल जाऊन लिफ्ट वरून खाली पडल्याने मॅकेनिकचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी चुनाभट्टी येथे घडली. केतन भैरात (४२) असे या मॅकेनिकचे नाव असून तो ठाणे येथे राहणारा आहे.

चुनाभट्टीच्या स्वदेशी मिल टॉवरमध्ये सोमवारी लिफ्टच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. केतन सायंकाळी चारच्या सुमारास लिफ्टच्या वरच्या बाजूला काम करत होता तर त्याचे इतर सहकारी दुसरीकडे काम करीत होते. तोल गेल्याने केतन खाली पडला आणि खाली असलेला लोखंडी रॉड त्याच्या शरीरात घुसला. काहीतरी पडल्याचा आवाज झाल्याने इतरांनी धाव घेतली आणि जखमी अवस्थेतील केतनला रुग्णलयात नेले. मात्र दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी चुनाभट्टी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *