यवतमाळमध्ये अपघात, नववधूसह तीन ठार

मारेगावजवळ मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास ट्रक आणि मॅक्स गाडीचा अपघात झाला. यात तीन ठार तर सहा जण जखमी झाले. चंद्रपूर येथील महाकाली देवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या कुटुंबातील नववधूसह तीन जण यात ठार झाले.

जखमी नववधूला उपचारांसाठी नागपूरला नेत असताना वाटेत तिचा मृत्यू झाला. लक्ष्मीबाई भारत उपरे (६०), सानिका किसन गोपाळे (२०) यांचा जागीच मृत्यू झाला तर नुकतंच लग्न झालेल्या साक्षी देवीदास उपरे (१८) यांचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला. राजनंदिनी सुनील पवार (४), साधना कोंडबा गोंधरे (३५). पूजा शंकर उपरे (२०), चंपाबाई पेंडलेवार (७०) अशी जखमींची नावे आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *