‘स्टुडंट ऑफ द ईअर 2’च्या कलाकारांचा लूक आणि पोस्टर प्रदर्शित झालेय. स्वत: करण जोहरनेटायगर श्रॉफ, तारा सुतारिया आणि अनन्या पांडे या लीड स्टारकास्टचा लूक सोशल मीडियावर शेअर केला. यातील विशेषत: तारा सुतारियाच्या लूकची सध्या जोरदार चर्चा आहे.
ताराचा ‘स्टुडंट ऑफ द ईअर 2’मधील लूक अनेकांना आवडला असला तरी न आवडणा-यांची संख्या मोठी आहे आणि याचमुळे तारा सध्या ट्रोल होतेय. भारतातल्या कुठल्या कॉलेजात मुली असे कपडे घालतात? असा प्रश्न तिचा हा लूक पाहून अनेकांनी विचारला आहे. करण जोहर अतिकाल्पनिक आणि वास्तवाशी दूर दूरपर्यंत संबंध नसलेली कल्पना विकू पाहतोय, असे मतही अनेकांनी नोंदवले आहे.तारा सुतारियासारखे कपडे घालून तुम्ही कॉलेजात गेलाच तर तुम्हाला गेटमधूनच हाकलून लावण्यत येईल. पाश्चात्य देशांची कॉपी करू नका. आम्हाला बॉलिवूड चित्रपट आवडतात. हॉलिवूड प्रभावित चित्रपट नाही. हेच पाहायचे असेल तर आम्ही हॉलिवूड चित्रपट पाहू, असे एका युजरने लिहिले आहे.
आपण भारतात राहतो आणि प्रत्येक व्यक्ती कॉलेजात शिकायला जाते. तुम्ही जे काही खपवत आहात, ते मुळीच सामान्य नाही. कहाणी विकण्यासाठी काहीही करू नका, अशी प्रतिक्रिया एका युजरने नोंदवली आहे.
Student of the Year 2चे पोस्टर पाहून भडकले युजर्स!!
