राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर यांच्या ‘स्त्री’ हा हॉरर-कॉमेडी चित्रपट गतवर्षी प्रदर्शित झाला आणि चित्रपटावर प्रेक्षकांच्या उड्या पडल्यात. समीक्षकांनीही हा चित्रपट डोक्यावर घेतला. १२९ कोटींची घसघशीत कमाई करून या चित्रपटाने अनपेक्षित धक्का दिला. चित्रपटाचे हे अनपेक्षित यश पाहून मेकर्सनी लगेच ‘स्त्री’चा सीक्वल येणार, हे जाहीर केले आणि या चित्रपटाची तयारी सुरु झाली. आता याच सीक्वलबद्दल एक मोठी बातमी आहे. होय, ‘स्त्री’च्या सीक्वलमध्ये राजकुमार राव दिसेल, अशी आस लावून बसलेल्या चाहत्यांसाठी ही बातमी जरा धक्कादायक असू शकते. कारण ताजी बातमी खरी मानाल तर, या सीक्वलमध्ये राजकुमार रावऐवजी अभिनेता वरूण धवनची वर्णी लागू शकते.