श्रीदेवींच्या साडीचा लिलाव सुरूच; लाखांच्या वर बोली

दिवंगत ज्येष्ठ अभिनेत्री श्रीदेवी यांची आज पहिली पुण्यतिथी आहे. गेल्या वर्षी २४ फेब्रुवारी २०१८ रोजी श्रीदेवी यांचं निधन झालं. श्रीदेवी यांच्या आवडत्या साड्यांपैकी हातने विणलेली एक  कोटा साडी लिलावासाठी ठेवण्यात आली आहे. लिलावातून आलेली रक्कम एका सामाजिक संस्थेला दान म्हणून देण्यात येणार आहे. श्रीदेवी यांच्या पहिल्या पुण्यतिथी आधीच साडी लिलावासाठी ठेवण्यात आली आहे.

चेन्नईतील ऑनलाईन मंच ‘पेरिसेरा’नुसार, कपूर कुटुंबियांनी लिलावातून मिळालेली रक्कम एका धर्मार्थ ट्रस्ट कंसर्न इंडिया फाउंडेशनला दान करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे फाउंडेशन महिला, वृद्ध, दिव्यांग आणि मुलांसाठी शिक्षण, आरोग्य आणि त्यांच्या सामुदायिक विकासासाठी काम करते.

‘पेरिसेरा’ भारतीय हस्तशिल्पामधील विशेषज्ञ आणि ‘बीइंग जनेरस, विथ श्रीदेवी’ यांच्याकडून ऑनलाईन लिलावाचे आयोजन करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी ४० हजार रूपयांपासून या साडीच्या लिलावासाठी सुरूवात झाली होती. हा लिलाव अजूनही सुरूच आहे. आतापर्यंत लिलावाची बोली १,३०,००० रूपयांपर्यंत पोहचली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *