पालकमंत्र्यांच्या समोर भाजपच्या माजी नगरसेवकाचा जाळून घेण्याचा प्रयत्न

भाजपचे माजी नगरसेवक आणि माळी समाजाचे नेते अरुण भेदे यांनी कामगार कल्याण विभागाच्या कार्यक्रमात स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून जाळून घेण्याचा प्रयत्न केला. शासकीय जागेवरचे अतिक्रमण काढण्यात यावं, या मागणीसाठी वारंवार निवेदन देऊन आणि आंदोलन करूनही प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा त्यांचा आरोप होता. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या समोर त्यांना स्वत:ला जाळून घेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यानं मोठा अनर्थ टळला. अरूण भेदे यांनी आठ दिवसांपूर्वीच प्रशासनाला आत्मदहनाचा इशारा दिला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *