१२०० स्क्वेअर फूट जागेसाठी महिलेला नग्न करून मारहाण

 महिलेला नग्न करून मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. केवळ बाराशे स्केवर फुटाच्या जागेसाठी एका महिलेला नग्न करून जबर मारहाण करण्यात आली आहे,गेल्या महिन्यातील ही घटना असून, मात्र हा व्हीडिओ समोर आल्यानंतर या घटनेचा उलगडा झाला. अंगावर कपडे नसल्याने ग्रामस्थ त्या महिलेला झाकण्याचा प्रयत्न करीत असताना आरोपींनी ग्रामस्थांनाही पिटाळून लावलं. पीडित महिला सिल्लोड ग्रामीण पोलिसांकडे होमगार्ड पदावर काम करते. तिच्या आईच्या नावावर असलेल्या जागेवर तिच्या चुलत्यांचा डोळा आहे. त्यामुळे पीडित महिला आणि तिच्या वयोवृद्ध आईला जागेवरून पिटाळून लावण्यासाठी आरोपींनी पीडितेला नग्न करून मारहाण केली. आरोपीचा नातेवाईक सिल्लोड पोलीस ठाण्यात असल्याने आरोपींवर कारवाई करण्यात आली नाही असा आरोप महिलेने केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *