लातूर-नांदेड महामार्गावर टेम्पोने वाहतूक पोलिसाला चिरडले, चालकाला अटक

लातूर-नांदेड महामार्गावर एका भरधाव वेगाने आलेल्या टेम्पोने महामार्ग पोलीस कर्मचाऱ्याला जोरदार धडक दिली. या धडकेत पोलीस कर्मचारी नागेश चौधरी यांचा जागीच मृत्यू झाला. चाकूर तालुक्यातील घरणी येथे ही घटना घडली. याप्रकरणी टेम्पो चालकाला चाकूर पोलिसांनी अटक केली आहे.

महामार्ग पोलीस ठाण्याचे पाच कर्मचारी सकाळी लातूर – नांदेड रस्त्यावरील नळेगाव रोडवर वाहनांची तपासणी करीत थांबले होते. त्यावेळी भरधाव वेगात वडवळ नागनाथ येथून टोमॅटो घेऊन मुंबईकडे जात असलेल्या टेम्पोने महामार्ग वाहतूक पोलीस कर्मचारी नागेश सूर्यकांत चौधरी (३२, रा. देवंग्रा ता. औसा ) यांना जोराची धडक दिली. या धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. लातूर येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. टेम्पो चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *